इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकत्व स्वीकारणार !

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त मुलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकत्व स्वीकारणार !

| Updated on: Jul 22, 2023 | 10:38 AM

शिंदे गटाच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे या आज इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त मुलांचं सांत्वन करण्यासाठी नडाळा पंचायत मंदिरात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व स्वीकरणार आहेत. यासाठी नीलम गोऱ्हे मुख्यमंत्र्याच्यावतीनं मुलांचं पालकत्व घेणार आहेत.

रायगड, 22 जुलै 2023 | इर्शाळवाडीवर दरड कोसळली आणि 40 ते 50 घरांचं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. आता पर्यंत या दुर्घटनेत 22 जणांचे मृतदेह सापडले असून 119 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. इर्शाळवाडीत दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरुच होतं. या दुर्घटनेतून ग्रामस्थ अजूनही सावरलेले नाही आहेत. इर्शाळवाडी ग्रामस्थांची तात्पुरती राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नडाळ पंचायत मंदिरात करण्यात आली आहे. दरम्यान दुर्घटनाग्रस्त मुलांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. ते या मुलांचं पालकत्व शिंदे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुलांचं पालकत्व स्वीकारण्याची माहिती दिली.यावेळी नीलम गोऱ्हे यांनी इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली.

Published on: Jul 22, 2023 10:38 AM