एकनाथ शिंदे रॉकेट, फडणवीस सुतळी बॉम्ब, ठाकरे राऊत कोण, कुणी फोडले राजकीय फटाके?
जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावतीने हास्य दीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी राजकीय फटाके फोडले. खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना त्यांनी उपमा दिलीय.
जामनेर | 18 नोव्हेंबर 2023 : जळगावातील जामनेर येथे हास्य दीपावली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हास्य जत्राचे कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांनीही उपस्थिती लावली होती. अभिनेता डॉ. निलेश साबळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना काही प्रश्न विचारले त्याला उत्तर देताना गिरीश महाजन यांनी राजकीय फटाके फोडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुतळी बॉम्ब आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॉकेट आहेत असे मंत्री महाजन म्हणाले. तडतड करणारा फुलबाजा म्हणजे संजय राऊत आणि दोन्हीकडे हात ठेवणारे डबलबार म्हणजे उद्धव ठाकरे अशी उपमा त्यांनी या नेत्यांना दिली.
Published on: Nov 18, 2023 07:44 PM
Latest Videos