बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज अनावरण, कोण-कोण हजेरी लावणार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज अनावरण, कोण-कोण हजेरी लावणार?

| Updated on: Jan 23, 2023 | 9:24 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण आज करण्यात येणार आहे. पाहा...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज अनावरण आज करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. शिवाय ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ प्रदान सोहळा आणि ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. याशिवाय ठाकरेगट आणि शिंदेगट यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.