शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर जाणार

शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर जाणार

| Updated on: Feb 11, 2023 | 1:02 PM

यंदा शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. शिवनेरीवरील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पाहा...

शिवजयंती म्हणजे शिवभक्तांसाठीचा उत्साहाचा दिवस. या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. किल्ले शिवनेरीवर विविध भागातून शिवभक्त येत असतात. यंदा शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. 19 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवर एकनाथ शिंदे जाणार आहेत. या दिवशी शिवनेरीवर शासकीय सोहळा दिमाखात पार पडणार आहे. शिवनेरीवरच्या शिवजयंती सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्विकारलं आहे. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे.

Published on: Feb 11, 2023 01:01 PM