“समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत”, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
समृद्धी महामार्गावरील शहापूर सरलांबे इथे काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पुलाचं काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळल्याने अपघात झालाय.यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावरील शहापूर सरलांबे इथे काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पुलाचं काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळल्याने अपघात झालाय.यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शहापूरजवळ समृद्धी महामार्गाचं काम सुरु होतं. त्यावेळी गर्डर लाँचिंग करत असताना तो कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्याबाबत आम्ही आता अधिकारी, पालकमंत्री हे त्या ठिकाणी पोहचले आहेत. बचावकार्यही सुरु करण्यात आलं आहे. सित्झर्लंडची कंपनी काम करत होती. मृतांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत शासनाने जाहीर केली आहे. तसंच हा अपघात कसा झाला त्याची चौकशी होईल आणि कारवाईही केली जाईल.”
Published on: Aug 01, 2023 11:41 AM
Latest Videos