उल्हासनगर मेट्रोबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; पाहा...

उल्हासनगर मेट्रोबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; पाहा…

| Updated on: Feb 16, 2023 | 8:23 AM

आता उल्हासनगरमधील नागरिकांनाही मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर मेट्रोबाबत महत्वाची घोषणा केलीये. पाहा...

उल्हासनगर : उल्हासनगर मेट्रोबाबत महत्वाची बातमी. आता उल्हासनगरमधील नागरिकांनाही मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर मेट्रोबाबत महत्वाची घोषणा केली आहे. “उल्हासनगर भागाचा विकास करायचा हा आमचा ध्यास आहे. पुनर्विकास लवकरात लवकर सुरू होईल. अनधिकृत, धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात येणारे अडथळे दूर केले जातील. त्यासाठी कायद्यातसुद्धा बदल केला आहे. पाण्याची आवश्यकता सुद्धा राज्य सरकार पूर्ण करणार आहे आणि लवकरच उल्हासनगरलासुद्धा मेट्रो येणार आहे. त्यासाठी आम्ही काम करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणालेत. आम्हाला ठाणे, कल्याण सारखं उल्हासनगरही विकसित करायचं आहे, असंही ते म्हणालेत.

Published on: Feb 16, 2023 08:23 AM