दिलीप लांडे 2024 ला रेकॉर्डब्रेक मतानं पुन्हा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा

“दिलीप लांडे 2024 ला रेकॉर्डब्रेक मतानं पुन्हा जिंकणार”, मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा

| Updated on: Jun 07, 2023 | 7:55 AM

चांदीवली येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. शिवसेना नेते दिलीप लांडे हे पुन्हा आमदार होणार असा दावाच मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

मुंबई : चांदीवली येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. शिवसेना नेते दिलीप लांडे हे पुन्हा आमदार होणार असा दावाच मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. “ना जात पे, ना पात पे मोहर लगा दो मामा के नाम पर. दिलीप लांडे यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. विकासाचं राजकारण केलं. म्हणून 2024 रिकाँर्डब्रेक मतांनी दिलीप मामा पुन्हा जिंकणार. दिलीप मामा पुन्हा आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच “गरिबो का मसीहा असं नाव मामा लांडे है. तुमच्या सुखदु:खात येणारा मामा आहे”, असंही शिंदे म्हणाले.

Published on: Jun 07, 2023 07:55 AM