Budget 2024 : विरोधकांचा सुपडा साफ, घरी बसलेले घरीच बसणार; अर्थसंकल्पावरून शिंदेंचा खोचक टोला
अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला तर अर्थसंकल्पावर बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पाची तुलना उद्धव ठाकरे यांनी जादूच्या प्रयोगाशी करत हल्लाबोल केला
मुंबई, १ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला तर अर्थसंकल्पावर बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पाची तुलना उद्धव ठाकरे यांनी जादूच्या प्रयोगाशी करत हल्लाबोल केला. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केल्याचे पाहायला मिळत आहे. ‘देशातील महिलांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प आहे तर रोटी कपडा आणि मकान देणारा हा अर्थसंकल्प आहे. घरी बसणारे घरीच बसणार नेता ठरवू शकत नाहीत तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय टक्कर देणार?’, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत उद्धव ठाकरे यांनाच अप्रत्यक्षपणे सवाल केला. तर विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.