शिंदे यांच्या शिवसेनाचा धक्का, एकनाथ शिंदे यांच्या रडारवर संजय राऊत? बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दिला धक्का, काय आहे प्रकरण बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आल्याचे समोर आले आहे. त्यामुळं आता व्हीप काढून अपात्रतेची रणनीती आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना हा धक्का दिल्याचं मानलं जात आहे. तर संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन संजय राऊत यांच्या ऐवजी आता गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील पत्र शिवसेनेनं लोकसभा सचिवांना दिल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे. लोकसभा सचिवांनी मान्यता दिल्यावर, गजानन किर्तीकर शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते होतील. महाराष्ट्र विधीमंडळ असो की संसद शिवसेना पक्ष हा एकच आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून किर्तीकर संसदेत व्हीप काढू शकतात आणि हा व्हीप राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते आणि जर अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते.