एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार, ठाकरे गटाच्या मेळाव्यात काय बोलणार?

| Updated on: Jul 29, 2023 | 11:21 AM

VIDEO | ठाण्यात कधी आणि नेमका कुठं असणार उद्धव ठाकरे गटाचा मेळावा? एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात माजी मुख्यमंत्री होणार दाखल

ठाणे, 29 जुलै 2023 | शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची तोफ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात धडाडणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये दाखल होणार आहे. मुंबई नंतर ठाण्यात देखील हिंदी भाषिक मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहे. उद्धव ठाकरे गटाचा हिंदी भाषिक मेळावा ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 6:30 च्या सुमारास होणार आहे. यासाठी जय्यत तयारी ठाण्यात करण्यात आली आहे. तर जागो जागी बॅनरबाजीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात या मेळाव्यात हिंदी भाषिक यांचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे ,त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मराठी भाषिक नंतर हिंदी भाषिकांची देखील साथ मोठ्या प्रमाणात लाभणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंड पुकारल्या नंतर ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ठाण्यांमध्ये शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या वतीने उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

Published on: Jul 29, 2023 11:16 AM
बीएमसीवर महायुतीचाच महापौर होणार; ठाकरे गटाला डिवचताना उदय सामंत यांच मोठं वक्तव्य
तुळजाभवानी मंदिरातील शिवकालीन दागिने चोरीला, मोठी माहिती समोर!