Special Report | शिंदेंना संपवण्यासाठी नक्षलींना कोणी सुपारी दिली?

Special Report | शिंदेंना संपवण्यासाठी नक्षलींना कोणी सुपारी दिली?

| Updated on: Jul 22, 2022 | 8:37 PM

झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याची तयारी सुरू होती, मात्र यावेळी मातोश्रीवरून तत्कालीन गृहमंत्री शंभूराजे देसाई यांना एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा द्यायची नाही असा फोन मातोश्रीवरुन गेल्याचा ही खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदेंनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी नक्षलवाद्यांना सुपारी देण्यात आली होती असा आरोप आमदार सुहास कांदेंनी केला आहे. एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होते, त्यामुळे त्यांना मारण्याची सुपारीही त्यांना देण्यात आल्याची टीका करत असतानाच त्यांची झेड प्लस सुरक्षा न देण्याच्या सूचना मातोश्रीवरुन दिल्या गेल्याची टीका आमदार सुहास कांदेंनी केली आहे. त्यामुळे या वादाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. आमदार सुहास कांदेंनी सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट केला असला तरी ती सुपारी कोणी दिली याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आमदार एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यामुळे त्यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याची तयारी सुरू होती, मात्र यावेळी मातोश्रीवरून तत्कालीन गृहमंत्री शंभूराजे देसाई यांना एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा द्यायची नाही असा फोन मातोश्रीवरुन गेल्याचा ही खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदेंनी केला आहे.

Published on: Jul 22, 2022 08:37 PM