जे खोडा घालायला आले त्या सावत्र भावांना जोडा दाखवा, एकनाथ शिंदे यांचा टोला

जे खोडा घालायला आले त्या सावत्र भावांना जोडा दाखवा, एकनाथ शिंदे यांचा टोला

| Updated on: Aug 17, 2024 | 4:41 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ शनिवारी पुणे येथे करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधक सरकार पडण्यासाठी देव पाण्यात ठेवून होते. परंतू आमच्या बहीणींच्या आशीवार्दाने आमचे सरकार अधिक मजबूत झाले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही योजना सुरु झाली तेव्हा विरोधकांनी टिका केली आहे. सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करीत आहेत की ही योजना चुनावी जुमला आहे. कोणी म्हणते की 1500 रुपयांत काय येतं ही काही भीक देता काय ? ही काय लाच देता का विकत घेता का ? असे काही सावत्र भाऊ म्हणत आहेत. काहीही म्हणायला लागले अरे माझ्या या बहि‍णींबद्दल असे शब्द काढायला तुम्हाला मनाची नाही तर जनाची थोडी तरी आहे का असा सवालच एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. ही 1500 रुपयांत काय होणार असे विरोधक म्हणाले,तुमच्या सारखे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन माझ्या भगिनी आणि भाऊ जन्माला आलेले नाहीत. आता महिलांना माहेरला जाताना कोणा समोर हात पसरावे लागणार नाहीत. माझ्या बहि‍णींच्या आशीवार्दाने सरकार केवळ टिकलेच नाही तर अधिक मजबूत झाले आहे. आमचे मजबूत सरकार असल्याने अजित पवार देखील आमच्या बाजूने आले. त्यामुळे जे खोडा घालायला आले आहे. त्या सावत्र भावांना जोडा दाखवा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील बहिण माझी लाडकी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात केली आहे.

Published on: Aug 17, 2024 04:40 PM