मोदी-ठाकरेंची 'ती' भेट, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, एक नोटीस आली अन् XXX ...

मोदी-ठाकरेंची ‘ती’ भेट, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “एक नोटीस आली अन् XXX …”

| Updated on: Jun 20, 2023 | 10:58 AM

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केली. दोघांकडून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि भाजपवर निशाणा साधला. तर ठाकरेंनंतर शिंदेंनी आपल्या सभेमध्ये एक गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केली. दोघांकडून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि भाजपवर निशाणा साधला. तर ठाकरेंनंतर शिंदेंनी आपल्या सभेमध्ये एक गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी किती शिव्या दिल्या. अब्दाली, हिटलर, अफजलखान…अरे ते कुठे आणि तुम्ही कुठे, सर्व राज्याने पाहिलं आहे की एक नोटीस आली त्यावेळी लेंडी पातळ झाली होती. शिष्टमंडळ घेऊन गेले होते मोदींना भेटायला तेव्हा शिष्टमंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाई गेली आत. हे आम्हाला काही माहित नाही का?” असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 

Published on: Jun 20, 2023 10:58 AM