तुळजाभवानी देवी अलंकार गहाळ प्रकरण; पुन्हा होणार पुन्हा मोजदाद, धक्कादायक प्रकारानंतर जिल्हाधिकारी यांचे आदेश
तुळजाभवानी देवीच्या डब्यातील 8 ते 10 पुरातन अलंकार गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. पाहणीच्या दरम्यान ही बाब उघड झाल्याचे गंभीर आरोप पुजारी मंडळाकडून करण्यात आले होते.
धाराशिव, 25 जुलै 2023 | तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार तसेच भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची मोजणी पूर्ण होऊन तीन आठवडे लोटले. ही मोजणी पुर्ण झाल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. तुळजाभवानी देवीच्या डब्यातील 8 ते 10 पुरातन अलंकार गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. पाहणीच्या दरम्यान ही बाब उघड झाल्याचे गंभीर आरोप पुजारी मंडळाकडून करण्यात आले होते. त्यानंतर आता पुरातन काळातील 7- 8 दागिने गहाळ झाल्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर पुन्हा मोजणीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. तर देवीचे शिवकालीन दागिने असलेल्या 1 ते 7 नंबर डब्यांची पुन्हा मोजदाद होणार आहे. तर ही मोजणी महंत, पुजारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Published on: Jul 25, 2023 12:18 PM
Latest Videos