मनसेचे नेते राजू उंबरकर यांची वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार; नेमकं कारण काय?

| Updated on: Aug 22, 2023 | 3:54 PM

VIDEO | कार्यालयीन वेळात सरकारी कर्मचाऱ्यांनी हजर राहणे अपेक्षित आहे, शिवाय मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी असणे, हा सरकारी नियम आहे. पण अनेक अधिकारी, कर्मचारी दांड्या मारत असल्याचे मनसेचे नेते राजू उंबरकर यांची पोलिसांत तक्रार

Follow us on

नागपूर, २२ ऑगस्ट २०२३ | ग्रमीण भागातील वरीष्ठ पातळीवरील अधिकारी एकही दिवस या क्षेत्रात राहत नाहीत, त्यांना मेट्रो सिटीत राहायला आवडते. परंतु, अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना वेळेवर कागदपत्रे मिळत नाहीत, अधिकाऱ्यांकडे असणारे काम ते होत नाहीत. अधिकारी हे त्यांच्या केवळ स्वार्थासाठी येतात आणि कधी जातात हे लक्षात येत नाही. ज्या क्षेत्रात त्यांची ड्यूटी असते तिथे ते कार्यरत नसतात, म्हणून मनसेचे नेते राजू उंबरकर यांची वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, PWD, कृषी विभाग, भूमी अभिलेख, पंचायत समितीचे अधिकाऱी कार्यालयात नाहीत, कार्यक्षेत्रात नाही. मग त्या अधिकाऱ्यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची भिती व्यक्त करत अधिकारी कार्यालयात नसल्याने संतापलेले मनसे नेते राजू उंबरकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. कार्यालयीन वेळात सरकारी कर्मचाऱ्यांनी हजर राहणे अपेक्षित आहे, शिवाय मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्कामी असणे, हा सरकारी नियम आहे. पण अनेक अधिकारी, कर्मचारी दांड्या मारत असल्याचे राजू उंबरकर यांनी पोलिसांत तक्रार करत म्हटले आहे.