भाजपकडून ‘राजवाडा’ असा उल्लेख, काँग्रेस आक्रमक, पोलिसांनी अडवले
पुण्यात काँग्रेस आणि भाजपचा वाद चिघळला आहे. भाजपकडून काँग्रेस भवनाचा 'राजवाडा' असा उल्लेख करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयाला काँग्रेस भवनाच्या इतिहासाचे पुस्तक भेट म्हणून देणार आहेत.
पुणे : पुण्यातील विकास कामांवरून काँग्रेस आणि भाजपचा वाद चिघळला आहे. भाजपकडून काँग्रेस भवनाचा ‘राजवाडा’ असा उल्लेख करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयाला काँग्रेस भवनाच्या इतिहासाचे पुस्तक भेट म्हणून देणार आहेत. काँग्रेस भवनाचा सविस्तर इतिहास कळावा म्हणून हे पुस्तक काँग्रेस भाजप कार्यालयाला देणार भेट आहे. पुण्यात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखलं वेळीच रोखलं आहे. पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेस भवनात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पुण्यात भाजपने काय केलं? असं ट्वीट करत काँग्रेस भवनाचा फोटो भाजपच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे.