आशिष देशमुखांवर वडेट्टीवार बरसले; म्हणाले, त्यांचे वक्तव्य ही पान सुपारी घेऊन...

आशिष देशमुखांवर वडेट्टीवार बरसले; म्हणाले, त्यांचे वक्तव्य ही पान सुपारी घेऊन…

| Updated on: Apr 10, 2023 | 10:24 AM

ललित मोदी, निरव मोदी यांना राहुलजींनी चोर म्हटलय हा काय? ओबीसींचा अपमान आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी आशिष देशमुख यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाई बाबत बोलताना उपस्थित केला.

भंडारा : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर पक्षाच्या विरोधात बोलल्याने कारवाई केली जात आहे. यावरून देशमुख यांनी त्यांच्यावर काँग्रेसनं चुकीची कारवाई केल्याचे खापर आता काँग्रेसवर फोडत आहेत. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी, त्यांचा ओबीसीवर आपण कधी आवाजच ऐकला नाही. मला त्यांनी राहुल गांधी यांनी अपमान केला हाच आवाज ऐकू आला? काय त्यांनी अपमान केला? ललित मोदी, निरव मोदी यांना राहुल गांधी यांनी चोर म्हटलय हा काय? ओबीसींचा अपमान आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी आशिष देशमुख यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाई बाबत बोलताना उपस्थित केला. शिस्तभंग समितीसमोर उत्तर मांडण्याची त्यांना संधी देण्यात आली होती. ती संधी मांडली नसल्याने कदाचित त्यांच्यावर कारवाई झाली असावी. देशमुख यांचे वक्तव्य कुणाकडून पान सुपारी घेऊन केल्याचे वाटत आहे. पक्षश्रेष्ठींवर त्यांच्याकडून होत असलेल्या टीका याला आवाज उठवणे म्हणत नाही, असा टोला लगावला आहे.

Published on: Apr 10, 2023 09:20 AM