एकिकडे ‘हा’ बडा नेता काँग्रेसमधून भाजपात जाण्याची चर्चा, तर दुसरीकडे भारत जोडो यात्रेसाठी नेत्याचे परिश्रम!
तेलंगणातून ही यात्रा नांदेडमधील देगलूरमध्ये येईल. यात्रेचं देगलूरमध्ये जंगी स्वागत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर राहुल गांधींची पदयात्रा देगलूरमध्ये निघेल.
नांदेडः एकिकडे सरकार अस्थिर होणार असल्याचं भाकितं केली जात आहेत. त्यातच भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) काँग्रेसच्या आमदारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नांदेड आणि लातूरकर कधीही फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसायला तयार आहेत, असं मोठं वक्तव्य केलंय. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेचा महाराष्ट्रर दौरा यशस्वी करण्यासाठी नांदेडचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण मोठे परिश्रम घेत आहेत. भारत जोडो यात्रा आज सोमवारी रात्री नांदेडमध्ये येत आहेत. त्याची माहिती अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना दिली. तेलंगणातून ही यात्रा नांदेडमधील देगलूरमध्ये येईल. यात्रेचं देगलूरमध्ये जंगी स्वागत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर राहुल गांधींची पदयात्रा देगलूरमध्ये निघेल.