‘शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं’; काँग्रेसचा सणसणीत टोला
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हाथ मिळवणी केली आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. त्यानंतर आता एका वर्षानंतर आता पुन्हा अजित पवार हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत.
अमरावती : तत्कालिन महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवार यांच्यावर आर्थिक नाकेबंदीचा आरोप करत शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला होता. ज्यामुळे २०१९ मध्ये तत्कालिन मविआचं सरकार पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हाथ मिळवणी केली आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. त्यानंतर आता एका वर्षानंतर आता पुन्हा अजित पवार हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर त्यानी पुन्हा अर्थमंत्रालयावर ताबा घेतला आहे. यावरून काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. यावेळी यशोमती ठाकूर यांनी यांनी, अजित पवार आर्थिक नाकेबंदी करतात म्हणून महाराष्ट्राची हद्द ओलांडून सुरत मार्गे गुवाहाटी-गोवा करत राज्यात पोहोचलेल्या शिंदे गटाला शेवटी अजित पवारांच्याच टोलनाक्यावर येऊन थांबावं लागलं. ही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीची शोकांतिका आहे. शिंदे यांचे राजकीय अस्तित्व फार दिवसाचं नाही हेच आज सिद्ध झाले. हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे नसतील हे आज स्पष्ट झालंय यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. आता बच्चू कडू यांच्यावर देखील प्रतिक्रिया व्यक्त करताना, त्यांना कोणी महत्त्व देत नाही असेही त्या म्हणाल्या.