बंगळुरूमधील विरोधकांच्या बैठकीला मोठा धक्का; शरद पवार जाणार नाहीत? काँग्रेस नेता म्हणतो, ‘नाई नाई... ते...’

बंगळुरूमधील विरोधकांच्या बैठकीला मोठा धक्का; शरद पवार जाणार नाहीत? काँग्रेस नेता म्हणतो, ‘नाई नाई… ते…’

| Updated on: Jul 17, 2023 | 12:49 PM

बंगळुरूमध्ये दोन दिवस देशातल्या विरोधी पक्षांची बैठक होणार त्या बैठकीला शरद पवार जाणार नाहीत यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली

मुंबई, 17 जुलै 2023 | देशात भाजपला सध्या तोड देणारा दुसरा मोठा राजकीय पक्ष कोणताच राहिलेला नाही. तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी पाटणा येथे बैठक घेऊन भाजपविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर आता आगामी लोकसभेवरून पुन्हा नवी रणनिती ठरविण्यासाठी बंगळुरूमध्ये दोन दिवस देशातल्या विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार जाणार आहेत. मात्र याच्या आधीच राष्ट्रवादीत सुरू असणाऱ्या सध्याच्या घडामोडींमुळे शरद पवार हे विरोधी पक्षांची बैठकीला जाणार नसल्याचे कळत आहे. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी यावरून, पवार साहेब जातील. आज नाही तर उद्या जातील असं त्यांनी म्हटलं आङे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्याबाबतीत अजून काय म्हटलं आहे. पाहा या व्हिडीओत

Published on: Jul 17, 2023 12:49 PM