'मविआ'ला धक्का? अजित पवार जाण्याने किंवा राष्ट्रवादी फूटल्याने आघाडीत बिघाडी? बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘मविआ’ला धक्का? अजित पवार जाण्याने किंवा राष्ट्रवादी फूटल्याने आघाडीत बिघाडी? बाळासाहेब थोरात म्हणाले…

| Updated on: Jul 04, 2023 | 1:37 PM

त्यांच्यासोबत काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाच आहे. तर राष्ट्रवादितील अंतर्गत कलह ही चव्हाट्यावर आला आहे. यावरून राषट्रवादीच्या राजकीय वजनासह महाविकास आघाडीवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत बाहेर पडले. त्यांच्यासोबत काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाच आहे. तर राष्ट्रवादितील अंतर्गत कलह ही चव्हाट्यावर आला आहे. यावरून राषट्रवादीच्या राजकीय वजनासह महाविकास आघाडीवर देखील त्याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी विरोधी नेतेपदाचा राजीनामा दिल्याने आता यावर काँग्रेसने दावा केला आहे. तर आता मविआच संपल्याचे बोलले जात आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की विरोधी पक्ष नेत्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. तर महाविकास आघाडी ही आता अधिक भक्कम झाली आहे. मविआत कोणतीच बिघाडी झालेली नाही. आणि तसा कोणताही परिणाम हा होणार नाही.

Published on: Jul 04, 2023 01:37 PM