Bhai Jagtap | ‘मतं फुटल्याबाबत गांभीर्यानं विचार व्हायला हवं’

| Updated on: Jun 21, 2022 | 12:37 AM

परवा दिल्लीला आंदोलन आहे. त्यामुळे सर्व आमदार दिल्लीला जाणार आहोत. मी आमच्या पक्षश्रेष्ठीला सर्व सांगणार आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यावर चर्चा करून आम्ही कारवाई करू. अपक्षांनी ज्यांनी शब्द दिला होता, त्यांनी तो पाळला. एवढे मी ठामपणे सांगू शकतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी दिले आहे.

मुंबई : आतिशय धक्कादायक असा हा निकाल आहे. राजकारणात उलट सुलट होत असते. पण ज्या प्रकारे हांडोरेंचा पराभव झाला. त्याचे दुःख मला माझ्या विजयापेक्षा जास्त आहे. विरोधकांनी जो काही प्लान केला तो मान्यच करावा लागेल. राज्यसभेचे अपक्षावर खापर फोडले गेले. मात्र या निवडणुकीत सर्व पक्षाची मतं फुटले आहेत. त्याच्यावर अभ्यास करावाचं लागेल. उद्या आम्ही सर्वे बसून चर्चा करू. अतिशय वाईट प्रकारे हंडोरेंचा पराभव झाला. त्याचे खरंच मला फार धक्का बसला आहे. मी उद्या दिल्लीला जात आहे. परवा दिल्लीला आंदोलन आहे. त्यामुळे सर्व आमदार दिल्लीला जाणार आहोत. मी आमच्या पक्षश्रेष्ठीला सर्व सांगणार आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यावर चर्चा करून आम्ही कारवाई करू. अपक्षांनी ज्यांनी शब्द दिला होता, त्यांनी तो पाळला. एवढे मी ठामपणे सांगू शकतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी दिले आहे.

Published on: Jun 21, 2022 12:37 AM