फडणवीस, अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री बॅनरवरून सतेज पाटील यांचा खोचक टोला
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व असं ट्विट केलं होतं.
कोल्हापूर, 23 जुलै 2023 | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवसानिमित्ताने अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले. यावेळी फडणवीस आणि अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून देखील बॅनर्स लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व असं ट्विट केलं होतं. त्यावरून आता टीका आणि टोमने, टोलेबाजी होत आहे. याचमुद्द्यावरून काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी फडणवीस, अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री बॅनरवरून खोचक टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी, दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा. मात्र, मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा येथे होत नाही तर दिल्लीत होतो. तर दिल्लीच्या मनात काय? यावर सर्व गोष्टी ठरतात असा टोला लगावला आहे.