‘मी माझ्या दाव्यावरती ठाम, अजित पवारचं 101 टक्के मुख्यमंत्री होणार’; काँग्रेस नेत्याचा दावा
याचदरम्यान गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील असं वारंवार काही नेत्यांकडून बोललं जात आहे. त्यामुळे देखील राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान आता काँग्रेस नेते आमदार कैलास गोरंट्याल यांनी आता पुन्हा एकदा अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील असं ठाम म्हटलं आहे.
मुंबई, 25 जुलै 2023 | सध्या राज्यात निधी वाटपावरून गोंधळ सुरू असतानाच आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरूनही आता राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील असं वारंवार काही नेत्यांकडून बोललं जात आहे. त्यामुळे देखील राजकारण तापलेलं आहे. याचदरम्यान आता काँग्रेस नेते आमदार कैलास गोरंट्याल यांनी आता पुन्हा एकदा अजित पवार हेच मुख्यमंत्री होतील असं ठाम म्हटलं आहे. तर मी माझ्या दाव्यावरती ठाम आहे. देवेंद्र फडणवीस हे सुप्रीम कोर्ट पेक्षा मोठे आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. जर विधानसभा अध्यक्षांनी यांना अपात्र केलं नाही तर या 16 जणांना सुप्रीम कोर्टा अपात्र ठरवेल आणि एकनाथ शिंदे दहा ऑगस्टला पायउतार होतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील त्यांच्याच नेतृत्वामध्ये पुढच्या निवडणुका लढवल्या जातील. देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्याला अर्थ नाही. मी जे सांगतोय ऐका राज्यांमध्ये परिवर्तन अटल आहे आणि अजित पवारचे राज्याचे मुख्यमंत्री बनणार असं ही त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, त्यामुळे टोल नाका फोडणे इतकं मोठं काम नाही. पण ठाकरे यांनी मनसे भक्कम करण्याकडे लक्ष द्यावं. तर भविष्यामध्ये त्यांनी काँग्रेस सोबत यावं महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं आणि आम्ही चारी पक्ष मिळून मग भाजपला सडेतोड उत्तर देऊ असं म्हणताना थेट प्रस्तावच दिला आहे.