‘रामा चंद्र कह गये क्या से ऐसा कलयुग आयेगा हंस चुकेगा दाना और कव्वा मोती ऊठायेगा’; काँग्रेस नेत्याचा टोला
यावेळी त्यांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप काँग्रेससह ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून करण्यात येत आहे. तर निधी वाटपावरून ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर हे निधी वाटपावरून न्यायालयात जाण्याच्या विचारात आहेत.
मुंबई | 25 जुलै 2023 : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यातून अनेक आमदारांना निधी दिला. मात्र यावेळी त्यांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप काँग्रेससह ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून करण्यात येत आहे. तर निधी वाटपावरून ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर हे निधी वाटपावरून न्यायालयात जाण्याच्या विचारात आहेत. तर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील निधी वाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तर आता काँग्रेस नेते आमदार कैलास गोरंट्याल यांनी देखील टीका केली आहे. त्यांनी, या सरकारवर मला अजिबात विश्वास नाहीये, कारण आम्हाला अजिबात निधी दिलेला नाहीये असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तर यावेळी त्यांनी, रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुगेगा दाना तुन का कौआ मोती खाएगा हा दोहा ऐकवत असच काहीसं सरकारमध्ये सुरू असल्याचं टोला देखील यांना लगावला आहे. तर त्यांनी आणखीन कोणते आरोप करताना काय म्हटलं आहे पाहा…