VIDEO | अजित पवार यांच्या शुभेच्छांना काँग्रेस नेत्याचं प्रत्युत्तर, म्हणाला...

VIDEO | अजित पवार यांच्या शुभेच्छांना काँग्रेस नेत्याचं प्रत्युत्तर, म्हणाला…

| Updated on: May 27, 2023 | 1:55 PM

महाविकास आघाडीमध्ये चुरस पहायला मिळत आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीत मात्र यावरून मतभेद असल्याचे दिसत आहे. याचे कारण आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य.

पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुण्यातील पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यावरून आता राज्यातील राजकारण चंगलेच तापललं आहे. भाजपने तर ही जागा आपली असल्याचे सांगत तयारी सुरू केली आहेत. त्यावरून तेथे इच्छुकांची बॅनरबाजी सुरू आहे. यावरूनच महाविकास आघाडीमध्ये चुरस पहायला मिळत आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीत मात्र यावरून मतभेद असल्याचे दिसत आहे. याचे कारण आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य. त्यांनी आज पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे. तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट. ताकद जास्त म्हणजे वजन करायचे का? तर नाही… मागील निवडणुकीत ज्यांना जास्त मते त्यांची ताकद जास्त असे समजता येईल. आमच्या मित्र पक्षांना बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या मित्र पक्षाला शुभेच्छा!, असे मोजक्या शब्दांत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावरून काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचीच जास्त ताकत आहे. शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचे सांगितलं आहे.

Published on: May 27, 2023 01:55 PM