'जरांगेंना संपूर्ण सुरक्षा द्या, त्यांच्या केसाला धक्का लागला...' काय म्हणाले नाना पटोले

‘जरांगेंना संपूर्ण सुरक्षा द्या, त्यांच्या केसाला धक्का लागला…’ काय म्हणाले नाना पटोले

| Updated on: Jan 26, 2024 | 9:08 PM

मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण देण्याचे वचन भाजपाने साल 2014 च्या निवडणूकीपूर्वी दिले होते. परंतू केंद्र सरकारकडे राक्षसी बहुमत असताना मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार कोणाची वाट पाहात आहे असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. सरकार पन्नास टक्के मर्यादा वाढवून मराठ्यांना आरक्षण देऊ शकते. परंतू सरकारला मराठा आणि ओबीसीत वाद लावून गरीबी, बेकारी या मूळ प्रश्नांना बगल द्यायची असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठ्यांना आणि धनगर समाजाची चेष्टा चालविली आहे. साल 2014 मध्ये सत्तेत येताना भाजपा सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात वचन दिले होते. केंद्र सरकार 50 टक्क्यांची मर्यादा हटवून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकते असे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. जातीनिहाय जनगणना करुन ज्या जातींच्या संख्येनुसार आरक्षण द्यायला हवे. परंतू मराठा आणि ओबीसीत भांडणे लावून मुळे महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करण्याचा भाजपाचा डाव असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा पुरवण्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस पुरविण्यात यावेत अशी मागणी कॉंग्रेस नेते नाना पटाले यांनी केली आहे.

 

Published on: Jan 26, 2024 09:08 PM