काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा, नसीम खान यांना 'या' पक्षाने दिली ऑफर

काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा, नसीम खान यांना ‘या’ पक्षाने दिली ऑफर

| Updated on: Apr 27, 2024 | 2:13 PM

काँग्रेस नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने राज्यात एकाही अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आपण दुखावलो आहोत. असं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने राज्यात एकाही अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आपण दुखावलो आहोत, असं नसीम खान यांनी म्हटलं आहे. नसीम खान राजीनामा दिल्यानंतर त्यांना एमआयएम, महायुती आणि वंचित आघाडीने पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यावर नसीम खान यांनी थेट भाष्य केलं आहे. वंचित आणि महायुतीची ऑफर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. एमआयएमने ऑफर दिली. त्याबद्दल मला भाष्य करायचं नाही, असं नसीम खान यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Published on: Apr 27, 2024 02:11 PM