‘भाजपाची विचारसरणी महिलांच्या विरोधात, म्हणूनच…’ काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?
VIDEO | आंतररष्ट्रीय पातळीवर भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारत नसणार तर..., काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बडतर्फ केल्या नंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेस आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी आज पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आंतररष्ट्रीय पातळीवर भारत हा नेहरू गांधी यांचा भारत म्हणूनच ओळखला जाणार आहे, तो मोदींचा भारत नसणार आहे मोदी इज नॉट इंडिया अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी टीका केली. भाजप नेत्यांकडून महिलांवर होत असलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्यावर जोरदार टीका केली. त्यासाठी त्यांनी थेट सावरकरांच्या पुस्तकाचा आधार घेतला. काँग्रेसची एक विचारधारा आहे आणि त्यानुसार सावरकरांची भूमिका काँग्रेसला मान्य नाही आणि म्हणूनच त्यांनी त्याबाबत असे वक्तव्य केले असल्याचे सांगतानाच महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचे त्या म्हणाल्या. भाजप हा मुख्य स्पर्धक आहे आणि सर्व विरोधक एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षे विरोधात जाण्यासाठी ३० दिवस असतात आम्ही या निर्णय विरोधात अपील करू असंही त्या म्हणाल्या. इतरही अनेक मुद्द्यांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.