अजित पवार यांच्या समावेशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह गडकरी यांचा विरोध; माजी मुख्यमंत्र्याचा मोठा दावा
यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट करताना अजित पवार आणि राष्ट्रवादीचा या सरकारमध्ये झालेला समावेश काही भाजप नेत्यांच्या पचणी पडलेला नसल्याचे म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना मोठा दावा केला आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात पुढे काय पाहायला मिळते याचे चित्रच स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट करताना अजित पवार आणि राष्ट्रवादीचा या सरकारमध्ये झालेला समावेश काही भाजप नेत्यांच्या पचणी पडलेला नसल्याचे म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना मोठा दावा केला आहे. त्यांनी भाजपला आता एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता राहिलेली नसून त्यांच्या सह 16 आमदार हे अपात्र झाल्यास मुख्यमंत्रीपदी अजित पवार हेच दिसतील असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या समावेशाने मात्र भाजपच्या वरिष्ठ पातळीला ते मान्य झालेले नाही. यामुळे केंद्रिय मंत्री नितिन गडकरी गट नाराज झाला आहे. तर अशीच नाराजी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील असल्याचे त्यांनी बोललं आहे. त्यांना हे दावे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहेत.