अजित पवार यांना कोणाचा सल्ला? म्हणाला, ‘आघाडी म्हणून लढायचं असेल तर धर्म पाळा’
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बापट लढत असलेल्या मतदार संघातील जागा काँग्रेस जिंकु शकली नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना सल्ला दिला आहे. त्यांनी अजित दादा म्हणत असतील तर कसब्याची जागा ही काँग्रेसने 38 वर्षानंतर जिंकली.
नागपूर : महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सध्या पुण्याच्या जागेवरून रस्सी खेच होताना दिसत आहे. यावरूनच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बापट लढत असलेल्या मतदार संघातील जागा काँग्रेस जिंकु शकली नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना सल्ला दिला आहे. त्यांनी अजित दादा म्हणत असतील तर कसब्याची जागा ही काँग्रेसने 38 वर्षानंतर जिंकली. अनेक ठिकाणी 2014 मध्ये अनेकांचा पराभव झाला. मोठे मोठे दिग्गजही पराभूत झाले आहे. त्यामुळे त्याची तुलना करण्यापेक्षा उदाहरण म्हणून कसबा किती वर्षांनी जिंकली हे पहा. तर काँग्रेसची ताकद वाढली असा म्हणायचं नाही. पण महाविकास आघाडी म्हणून लढायचा असेल तर आघाडी धर्म पाळला पाहिजे. त्या जागेवर वाद घालण्यापेक्षा ती काँग्रेसकडे होती, ती काँग्रेसकडे राहावी यासाठी सगळ्यांना समजदारीची भूमिका घेतली पाहिजे. काँग्रेसनेच ती जागा लढावी अस मोठ मन सगळ्यांनी करावं आणि त्यात सहकार्य करावं. तर आघाडी टिकावी यासाठी एकत्रपणे लढले पाहिजे असे मत प्रकट केलं आहे.