‘कुणी 70 वर्षांत काय केलं म्हणतात?’; पंतप्रधान मोदी यांना विरोधी पक्ष नेत्यानं सुनावलं
भारताचे चंद्रयान-३ मोहीम अखेर फत्ते झाली. यशस्वीरित्या चंद्रयान-३ अखेर चंद्रावर उतरले. त्यामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मात्र यावरून आता राजकारण तापलं आहे.
नागपूर : 24 ऑगस्ट 2023 | देशातील अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून चंद्रयान मोहीमेवर सतत प्रयत्न सुरू होते. गेल्यावेळी या मोहीमेत इस्रो थोडक्यात हुलकावणी दिली आणि चांद्रयान शेवटच्या क्षणी भरकटले. त्यामुळे अनेकांनी देशाची खिल्ली उडवली होती. पण काल इस्रोने जे इतरांना जमलं नाही ते करून दाखवलं आणि चंद्राच्या दक्षिण दृवावर चंद्रयान-३ यशस्वीरित्या उतरवले. तर विक्रम हा लँडर देखील चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला. त्याने चार फोटो देखील पाठवले आहेत. त्यामुळे देशात आनंदाचे वातावरण आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. यावरूनच काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, जगाला अभिमान वाटावा अशी इस्रोच्या शास्त्रज्ञांची कामगिरी आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी इस्रोची स्थापना केलीय. त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोनाचं हे यश आहे असं वडेट्टीवार म्हणाले. तर कोणी म्हणतात ७० वर्षांत काय केलं? इस्रोची स्थापना काही १० वर्षांत झाली नाही, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावलाय.