‘भ्रष्टाचाराचा खालपासून वरपर्यंत कळस’; काँग्रेस नेत्याची सरकारवर टीकास्त्र

‘भ्रष्टाचाराचा खालपासून वरपर्यंत कळस’; काँग्रेस नेत्याची सरकारवर टीकास्त्र

| Updated on: Jul 16, 2023 | 2:34 PM

चहापानचा कार्यक्रम सरकारकडून होणार आहे. याच्याआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे.

चंद्रपूर | 16 जुलै 2013 : राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांची आज बैठक होणार आहे. तर चहापानचा कार्यक्रम सरकारकडून होणार आहे. याच्याआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी विरोधक म्हणून आमची भूमिका ठरलेली आहे. हे सरकार सत्तेसाठी हपापलेलं आहे. सत्तेसाठी वाटेल ते अशी भूमिका या सरकारची आहे. तर यांना विकास वैगेरे काही नको आहे. तर राज्याच्या अनेक प्रश्नांना बगल देऊन लोकांना आप आपसात लोकांना झुंझवत ठेवायचं आणि मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं अशीच या सरकारची भूमिका असल्याची टीका यावेळी वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.

Published on: Jul 16, 2023 02:27 PM