‘लोक शिंदे, अजित पवार गटासह भाजपला विटलेत’; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

‘लोक शिंदे, अजित पवार गटासह भाजपला विटलेत’; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jul 13, 2023 | 11:40 AM

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामिल झाला आणि आणखीन समिरणं बदलली आहेत. ज्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकींचे समिकरण देखील बदलले आहे.

नागपूर : राज्यात सत्तेची समिकरण सध्या बदलली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामिल झाला आणि आणखीन समिरणं बदलली आहेत. ज्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकींचे समिकरण देखील बदलले आहे. त्यावरूनच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं भाष्य करताना महाविकास आघाडीवरून प्रतितिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी लोकसभेला जबाबदाऱ्या वाटून घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि जबाबदारीनं वागावं आणि लढावं लागेल असे म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेससाठी सध्या राज्यात पोषक वातावरण आहे. काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास, लोकांच्या नजरा आहेत आहेत. तर लोक या सत्तेतील तिन्ही पक्षांना विटलेत. यामुळे येत्या काळात आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने जागा सुद्धा वाटणार असा दावा त्यांनी केला आहे.

Published on: Jul 13, 2023 11:40 AM