‘आमदार पडतात की सरकार पडतं? सरकार पडतं की पळतं हे ही कळेल’, मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेस नेत्याची टीका
मात्र यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याचे संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यांनी जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू असे म्हटलं आहे. त्यावरून आता कोणाला मंत्री पद मिळणार याचीच चर्चा रंगली आहे.
चंद्रपूर : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार येऊन एक वर्ष झालं. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे यावरून मित्र पक्षांसह विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकवेळा टीका केली आहे. मात्र यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याचे संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यांनी जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू असे म्हटलं आहे. त्यावरून आता कोणाला मंत्री पद मिळणार याचीच चर्चा रंगली आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे सध्याही ऑक्सिजनवर आहे. तर या सरकारकडून त्यांच्या आमदारांना हा विस्ताराचा लॉलीपॉप दाखविला जातोय. चार जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय असल्याने विस्तार होईलच की नाही सांगता येत नसल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.