बीडमध्ये अमित देशमुख यांचा दावा? मुंडे यांच्यावर भर सभेत टीका, देशमुख म्हणाले, ‘स्वबळावर…’
त्यानंतर आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राष्ट्रवादीत देखील फूट पडली आणि शरद पवार आणि अजित पवार गट बनले. यामुळे आता मविआ म्हणावी तशी एकसंघ राहिलेली नाही. त्यामुळे आता आगामी निवडणुका कशा लढायच्या असा सवाल मविआच्या समोर उभा आहे.
बीड, 14 ऑगस्ट 2023 | महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे भाजपच्या विरोधात लढत होते. मात्र शिवसेना फुटली आणि शिंदे गट, ठाकरे गट तयार झाला. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राष्ट्रवादीत देखील फूट पडली आणि शरद पवार आणि अजित पवार गट बनले. यामुळे आता मविआ म्हणावी तशी एकसंघ राहिलेली नाही. त्यामुळे आता आगामी निवडणुका कशा लढायच्या असा सवाल मविआच्या समोर उभा आहे. तर अजित पवार गट वेगळा झाल्याने आता काँग्रेसला बळ मिळाले आहे. यावरूनच बीड काँग्रेसचे प्रभारी आमदार अमित देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या आमदारांना मोठा फटका बसणार अशी चर्चा रंगली आहे. बीड येथे देशमुख यांनी आज काँग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्वबळावर सुद्धा मैदानात उतरण्याची तयारी ठेवणार असल्याचे सागंत, ज्यांच्यासोबत आघाडी करून निवडणुका लढत होतो, आता तेच लोक दुसरीकडे गेले आहेत. त्यामुळे आता स्वबळावर निवडणुका लावल्याशिवाय पर्याय नाही असे म्हटलं आहे.