‘अजित पवार यांनी निधी वाटपात खैरात वाटली’; गद्दारांना सजा मिळण्याऐवजी…; काँग्रेस आमदाराची सडकून टीका
पावसाळी अधिवेशनात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटासह त्यांना सपोर्ट करणाऱ्या आमदारांना भरघोस निधी सोडला आहे. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांना लागणार विकास निधी दिला नाही.
मुंबई, , 24 जुलै 2023 | अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरिची चावी होती घेताच आठ दिवलसात आपलं काम केलं आहे. त्यांनी पावसाळी अधिवेशनात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटासह त्यांना सपोर्ट करणाऱ्या आमदारांना भरघोस निधी सोडला आहे. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांना लागणार विकास निधी दिला नाही. यावरून काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. राऊत यांनी, माझ्या हातात तुजोरी आहे म्हणून लुटमार करायची, याला लूटमार म्हणतात असा घणाघात केला होता. तर त्यानंतर अजित पवार यांनी असा कोणताही भेदभाव केला नसल्याचा खुलासा केला आहे. यानंतर आता निधी वाटपावरून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका करताना शिंदे गटातील आमदावर देखील निशाना साधला आहे. यावेळी गोरंट्याल यांनी अजित पवार यांनी निधी वाटपात खैरात वाटल्याची टीका केली आहे. तर ज्या गद्दारांना शिक्षा व्हायला हवी होती. त्यांना भरघोस निधी मिळत असल्याने गद्दारांची मजा असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शिंदे गटासह अजित पवार यांच्यावर आणखी काही टीका केली आहे ते पाहा…