'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल

‘जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी…,’ काय म्हणाले कैलास गोरंट्याल

| Updated on: Feb 26, 2024 | 6:38 PM

मनोज जरांगे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईला सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतू रात्री त्यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय रद्द करीत ते आपल्या गावी गेले. त्यांनी आमरण उपोषण देखील मागे घेतले आहे. आणि साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यांना सुरक्षा पुरविण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे आमदार उद्या राज्यपालांना भेटणार आहेत.

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील  याचं आंदोलन शांततेत सुरु होते. परंतू सरकारने त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत जरांगे यांच्यावर समाजमाध्यमांचा वापर करीत टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते चिडले आणि त्यातून त्यांनी कालची घटना केली असावी. या प्रकरणात त्यांची भीती खरी असावी त्यांना जीवाला खरंच धोका आहे, त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी म्हणून आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचे जालनाचे कॉंग्रेसचे आमदार कैला गोरंट्याल यांनी म्हटले आहे. जरांगे यांचा बोलवता धनी कोण आहे? असा सरकारला प्रश्न पडला आहे. सरकारने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सगळ्यांना पक्षांना फोडून त्यांची ताकद नष्ट केली आहे. आता काय राहीले आहे. राजेश टोपे यांचा साखर कारखान्याच्या शेजारीच जरांगे यांचे घर आहे. त्यांच्या पूर्वीपासून संबध आहेत. त्यामुळे जरांगे यांच्यावर विनाकारण आरोप करण्यात काही अर्थ नसल्याचेही गोरंट्याल यांनी म्हटले आहे. जरांगे यांचा सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता. परंतू त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. सरकारने केवळ झुलवत ठवेले. मराठा आरक्षणाचा अधिकार केवळ लोकसभेला आहे असे गोरंट्याल यांनी सांगितले.

Published on: Feb 26, 2024 06:32 PM