मी लोकांशी बोलत होते, त्याने मागून मारलं; प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला
काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. या हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं? हे प्रज्ञा सातव यांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितलं.
हिंगोली : काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. या हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं? हे प्रज्ञा सातव यांनी tv9 मराठीशी बोलताना सांगितलं. “मी मतदारसंघातील लोकांच्या घरी जाते त्यांचे प्रश्न समजून घेते. कालही असंच मी गेले होते. तेव्हा माझ्यावर हल्ला करण्यात आला. सगळ्यात आधी आमची गाडी अडवण्यात आली. गाडी कुणी अडवली म्हणून मी गाडीचं दार उघडलं. तर हल्लेखोर म्हणे, यापैकी मॅडम कोण आहेत? मला परिस्थितीचा अंदाज आला. त्यामुळे मी दार लावून घेतलं. मग माझी बॉडीगार्ड पुढे गेली. तिने त्या हल्लेखोराला बाजूला केलं. मग आम्ही पुढे गेलो. पुढच्या गावात गेलो. तिथे लोकांशी मी संवाद साधत होते. याचवेळी तो हल्लेखोर मागून आला आणि त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याने मला मारलं. त्यानंतर कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी त्या व्यक्तीला बाजूला केलं आणि मी गाडीत बसून निघाले”, असं म्हणत प्रज्ञा सातव यांनी घडल्या प्रकाराबद्दल सांगितलं.