सना खान हत्या प्रकरणात पोलिसांचे कडक पाऊल; काँग्रेस आमदाराची केली कसून चौकशी; नेमकं काय होईल उघड?
भाजप नेत्या सना खान उर्फ हिना खान हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात नागपूर पोलिसांनी एका आमदाराची कसून चौकशी सुरू केली आहे.
नागपूर : 24 ऑगस्ट 2023 | नागपूरमधील भाजप नेत्या सना खान उर्फ हिना खान हत्या प्रकरणात दरदरोज धक्कादायक बाबी समोर येत आहेत. यावेळी देखील काहीसा अशीच धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तर नागपूर पोलिसांकडून एका आमदाराची कसून चौकशी सुरू झालेली आहे. तर आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतं याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजप नेत्या सना खान आणि गुन्हेगार अमित साहू हे हनीट्रॅप चालवत होते. तर अमित साहू यानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले होते. तर हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती मिळाली होती. याचदरम्यान नागपूर पोलिसांना या प्रकरणात एका आमदाराची माहिती मिळाली होती.
त्याप्रमाणे नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशमधील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना समन्स बाजवला होता. तर आज त्यांना चौकशीला हजर राहण्याच्या सुचना केल्या होत्या. त्याप्रमाणे मुख्य आरोपी अमित शाहू आणि आमदार शर्मा यांची आमोरासामोर चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
गेल्या एका तासापासून त्यांची चौकशी केली जात असून त्यांची चौकशी परिमंडळ २ च्या कार्यालयात सुरू आहे. तर आता या चौकशीतून आणखी काही समोर येत का ते पोलिस पाहत आहेत. तर याच्याआधी केलेल्या चौकशीत मुख्य आरोप अमित साहू याला आमदार संजय शर्मा याने मदत केल्याची माहिती उघड झाली आहे.