‘आपलं मुख्यमंत्री पद जातील का? याची भीती मुख्यमंत्री शिंदे यांना’; काँग्रेस महिला नेत्याची घणाघाती टीका
त्यावेळी त्यांनी कोणाची गाडी पंचर झाली, कोणाच्या नाक्यावर येऊन थांबली हे महाराष्ट्र बघतोय. ज्या कारणाने एकनाथ शिंदे यांनी माविआ सरकार तोडलं तेच मुख्यमंत्री आता अजितदादांच्या नाक्यावर फसले अशी घणाघाती टीका केली होती.
अमरावती, 23 जुलै 2023 | काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गेल्या काही दिवसापासून टीका करताना दिसत आहेत. याच्या आधी देखील अजित पवार यांच्या शपथविधीनंतर यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी कोणाची गाडी पंचर झाली, कोणाच्या नाक्यावर येऊन थांबली हे महाराष्ट्र बघतोय. ज्या कारणाने एकनाथ शिंदे यांनी माविआ सरकार तोडलं तेच मुख्यमंत्री आता अजितदादांच्या नाक्यावर फसले अशी घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी शिंदे यांच्यावर घणाघात केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावरून टीका केली आहे. एका महिन्यात पाचवेळी तर एका आठवड्याच तीन वेळी शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. यावरून सध्या राज्याच अनेक चर्चा होताना दिसत आहेत. त्याचवेळी आता यशोमती ठाकूर यांनी, मुख्यमंत्री शिंदेंना असुरक्षित वाटत असेल आपलं मुख्यमंत्री पद जातील का त्यामुळे ते कदाचित पंतप्रधान मोदींना भेटले असतील असं म्हटलं आहे. तर याच्या आधी देखील त्यांनी शिंदेंचं भविष्य धोक्यात असे म्हणत शिंदेंवर निशाणा साधला होता.