राहुल गांधी यांच्यावरून ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका

राहुल गांधी यांच्यावरून ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका

| Updated on: Mar 25, 2023 | 8:01 AM

देशात संतापाची लाट उसळली अतनाच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. संसदेच्या सचिवालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर देशभरात काँग्रेस आक्रमक झाली. याचदरम्यान त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी भाजपकडून करणयात आली होती. देशात संतापाची लाट उसळली अतनाच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. संसदेच्या सचिवालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणामुळे आता केंद्र सरकारवर चौफेर टीका होत आहे.

याचदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून देखील केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. चोरांना चोर म्हटलंय. हा काय गुन्हा झाला का? असा संतप्त सवाल यात करण्यात आला आहे. तर देश लुटणाऱ्या अदानीवर कारवाईचे नाव नाही, पण चोरांना चोर म्हटल्याबद्दल राहुल गांधी कारवाई करण्यात आली. न्यायालयाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडल्याचेही टीका करण्यात आली आहे.

Published on: Mar 25, 2023 08:01 AM