हा तर कोश्यारींचा सन्मान, त्यांची हकालपट्टी करायला पाहिजे होती; नाना पटोले आक्रमक
भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून महाराष्ट्राचा अपमान केला गेला आहे, असंही पटोले म्हणालेत. त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. पाहा...
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यासारखा राज्यपाल महाराष्ट्राला पुन्हा कधीही भेटू नये. कोश्यारी यांनी राजीनामा स्विकारण्याची विनंती केली होती. त्यांची विनंती मान्य केली. त्यांचा राजीनामा मंजूर केला म्हणजे त्यांचा सन्मान केला गेलाय. त्यांचा असा सन्मान करण्यापेक्षा त्यांची हकालपट्टी करायला हवी होती, असं नाना पटोले म्हणालेत. कोश्यारी यांनी मोठं पाप केलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी त्यांना राज्यपालपदावर बसवलं गेलं होतं. ते जेव्हा-जेव्हा भेटायचे तेव्हा म्हणायचे हे सरकार कधी पडणार? असा राज्यपाल भाजपानं बसवला होता. अशा माणसाचा राजीनामा मंजूर करून महाराष्ट्राचा अपमान केला गेला आहे, असंही पटोले म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 01:12 PM
Latest Videos