Maharashtra Politics | मविआच्या वज्रमूठीला आणखी ताकद मिळणार? कोणता पक्ष होतोय सहभागी? कोण करतयं प्रयत्न?

Maharashtra Politics | मविआच्या वज्रमूठीला आणखी ताकद मिळणार? कोणता पक्ष होतोय सहभागी? कोण करतयं प्रयत्न?

| Updated on: May 20, 2023 | 4:19 PM

शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा झाली. त्यानंतरच वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? अशी जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे.

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येत महाविकास आघाडीची निर्मिची झाली. याद्वारे मविआकडून सत्ता धाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र याच बरोबर शिवसेनेची झालेली वाताहात थांबविण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू होते. त्यातुनच शिवशक्ती आणि भिमशक्तीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाले. शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा झाली. त्यानंतरच वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? अशी जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची येत्या आठवड्यात मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? यावरही चर्चा होणार असल्याचे म्हटलं जात आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहू शकतात.

Published on: May 20, 2023 04:17 PM