फक्त विरोधकांनाच त्रास दिला जातोय, हा सत्तेचा दुरूपयोग नाही?; भाजपवर राऊतांचा हल्ला
याप्रकरणावरून हेच लक्षात येतं की भाजपवालेच ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहेत. तर ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना त्याचा जास्त आनंद झाला आहे
नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 14 विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर सीबीआय आणि ईडीचा मनमानी वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागत हे थांबवा अशी विनंती केली होती. त्यावर यावेळी न्यायालयाने याचिका फेटाळताना विरोधी पक्षांना सुनावलं. “त्यावरून भाजपने विरोधकांना बोचणारी टीका केली होती. त्यावर आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ती याचिका धुडकावली नाही तर सबळ पुरावे द्या म्हणत बाहेर काढल्याचे म्हटलं. त्यामुळे याबाबतीत आम्ही सबळ पुरावे घेऊन पुन्हा याचिका दाखल करणार आहोत.
तर याप्रकरणावरून हेच लक्षात येतं की भाजपवालेच ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहेत. तर ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना त्याचा जास्त आनंद झाला आहे. मी राज्यातील दोन ताजी प्रकरण राहुल कूल आणि दादा भूसे यांची दिली पण त्यावर कोणतीही कारवाई अजूनही नाही. पण विरोधक असणाऱ्या हसन मुश्रीफांना ईडी सतत बोलावत आहे. हा विरोधाभास नाही का? हा सत्तेचा दुरूपयोग नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.