पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम

पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम

| Updated on: Jan 28, 2023 | 1:39 PM

पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस मात्र ठाम आहे. पाहा व्हीडिओ...

पिंपरी-चिंचवड : लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लागली आहे. या जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी भाजप आग्रही आहे. पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस मात्र ठाम आहे.त्यामुळे विधानसभा बिनविरोध होण्याची आशा धूसर झाली आहे. महाविकास आघाडी असली तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. आज चिंचवड विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे उमेदवारही सहभागी झाले होते.काही जणांचे उमेदवारी अर्ज शहराध्यक्ष कैलास कदम यांनी स्वीकारले आहेत.

Published on: Jan 28, 2023 01:39 PM