विदर्भातील काँग्रेस नेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला, काय आहे कारण?
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये दर मंगळवारी एकापक्षाचा आणि नेत्याचा पक्षप्रवेश होतो. आता मंगळवारी देखील मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होईल असे म्हटलं होतं. याचदरम्यान काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विधान केल्याने आशिष देशमुख यांना काँग्रेसने नोटीस दिली. त्यांना निलंबित करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये दर मंगळवारी एकापक्षाचा आणि नेत्याचा पक्षप्रवेश होतो. आता मंगळवारी देखील मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होईल असे म्हटलं होतं. याचदरम्यान काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. देशमुख आणि बावनकुळेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळता चर्चेला उधाण आले आहे. नागपूर भाजपच्या कार्यलयात देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतली. देशमुख यांनी बावनकुळे यांच्याकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी देशमुख-बावनकुळे यांच्या भेटीचे आगामी काळात परिणाम दिसतील असं सांगितलं जात आहे.