Ratnagiri Savarkar Gourav Yatra | रत्नागिरीतही सावरकर गौरवयात्रा, पालकमंत्र्यांसह शिवसेना भाजपचे नेते येणार एकत्र

Ratnagiri Savarkar Gourav Yatra | रत्नागिरीतही सावरकर गौरवयात्रा, पालकमंत्र्यांसह शिवसेना भाजपचे नेते येणार एकत्र

| Updated on: Apr 12, 2023 | 9:38 AM

रत्नागिरी शहरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात येणार आहे. ही गौरवयात्रा आज होणार असून ती जेलपासून सुरू होणार आहे. त्यानंतर त्याचे लक्ष्मीचौकामध्ये जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.

रत्नागिरी : काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून होत असलेल्या सावरकरांच्या अपमानाविरोधात राज्यात भाजपने राण उठवले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात येत आहेत. याच अनुषंगाने रत्नागिरी शहरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात येणार आहे. ही गौरवयात्रा आज होणार असून ती जेलपासून सुरू होणार आहे. त्यानंतर त्याचे लक्ष्मीचौकामध्ये जाहीर सभेत रूपांतर होणार आहे. तर यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नेते सहभागी होणार आहेत

Published on: Apr 12, 2023 09:38 AM