भाजपचा राहुल गांधींना पलटवार, रविशंकर म्हणाले, ओबीसींचा अपमान केला
राहुल गांधी हे जर विचार करून बोलतात असं मानलं तर राहुल गांधींनी ओबीसींचा जाणीवपूर्वक अपमान केला, असे भाजपचे मत असून भाजप त्याचा निषेध करत असल्याचं खासदार रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपने आता प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे खासदार रविशंकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी हे जर विचार करून बोलतात असं मानलं तर राहुल गांधींनी ओबीसींचा जाणीवपूर्वक अपमान केला, असे भाजपचे मत असून भाजप त्याचा निषेध करतो, असे भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींना 2019 मधील त्यांच्या एका भाषणाची शिक्षा झाली आहे. तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला अपमान करण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींनी शिवीगाळ केली होती. त्यासंदर्भात न्यायालयाने माफी मागणार का असे विचारले असता त्यांनी नाही म्हटले आणि त्यांना शिक्षा झाली.