चोरांच्या सरदाराला डाकू म्हटलं तर गुन्हा होत असेल तर… नाना पटोलेंचा भाजपला आवाहन
चोराला चोर म्हणणं हा गुन्हा असेल आणि चोराचा सरदार जो आहे त्याला डाकू म्हटलं तर गुन्हा आहे तर आम्ही हा गुन्हा सातत्याने करू. आमचं सदस्य रद्द करायचं असेल तर त्यांनी ते करावं.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केलेल्या कथित वक्तव्यावरून दिल्ली ते गल्लीपर्यंत गदारोळ सुरू आहे. तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. तसेच चोराला चोर म्हणणं हा गुन्हा असेल आणि चोराचा सरदार जो आहे त्याला डाकू म्हटलं तर गुन्हा आहे तर आम्ही हा गुन्हा सातत्याने करू. आमचं सदस्य रद्द करायचं असेल तर त्यांनी ते करावं.
लोकशाहीचे रोज मुडदे पाडण्याचं पाप बीजेपी करत आहे. त्याच्या विरोधात आम्ही लढू. कारण हा काँग्रेसचा अधिकार आहे. या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचं, देशाला उभं करण्याचं आणि या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम काँग्रेसनं केलंलं आहे. पण नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून देशाची संपत्ती विकून देत चालवला जात आहे. हा देश बरबाद केला जातोय. संविधानिक व्यवस्थेला तुडवलं जातयं. जनतेच्या सहकाऱ्यांना या हुकूमशाही व्यवस्थेला निसनाभूत करू असही पटोले म्हणाले.